Accident

मरीयम्मनहळ्ळीजवळ कंटेनरच्या यू-टर्नमुळे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

Share

विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट तालुक्यात मरीयम्मनहळ्ळीजवळ कंटेनर ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर सहप्रवासी गंभीर जखमी झाला. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मरीयम्मनहळ्ळी येथील मगिमाविनहळ्ळी क्रॉसजवळ कंटेनर ट्रकने अचानक यू-टर्न घेतल्याने दुचाकीची त्याला धडक बसली. या अपघातात गुंडा गावातील २२ वर्षीय व्ही. अनिल याचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकीवर मागे बसलेला शिवराम नामक युवक देखील गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारांसाठी होस्पेट येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मरीयम्मनहळ्ळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: