हुक्केरी शहराच्या बाहेरील भागात एका भरधाव टिप्परने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे.

संकेश्वरहून हुक्केरीच्या दिशेने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराकडे नेरली गावाजवळ एका महिलेने हात दाखवून लिफ्ट मागितली होती. त्या दुचाकीस्वाराने महिलेला गाडीवर बसवून हुक्केरीकडे येत असताना, पाठीमागून आलेल्या एका वेगवान टिप्परने दुचाकीला जोरदार कट मारला.

या धडकेमुळे दुचाकीवरून खाली कोसळल्याने संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी महिलेला उपचारासाठी तातडीने स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Recent Comments