छोटा बॉम्बे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाणिज्य नगरी हुबळीत आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाचा मुलगा बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाला स्फोटक वळण मिळाले आहे कारण या व्यावसायिकाच्या मुलाचा मृतदेह बागेत सापडला असून त्याच्या खुनात खुद्द बापाचाच हात असल्याचे पुढे आले आहे.

होय, ‘माझा मुलगा गायब आहे, प्लीज त्याला शोधा’, अशी पोलिसांच्या मागे भुणभुण लावत पोलिस स्टेशनमध्ये हायड्रामा करणाऱ्या पित्याचाच मुलाच्या खुनात हात असल्याचे धक्कादायक गुपित उघड झाले आहे. व्यापारी भरत जैन यांचा मुलगा अखिल जैन (30) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अखिलच्या भावाने ३ डिसेंबर रोजी केशवापूर पोलीस ठाण्यात अखिल बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मुलगा बेपत्ता झाल्याबद्दल वडील भरत जैन यांनी पोलिस ठाण्यात हायड्रामा केला होती. मात्र तपासाला गती देताना पोलिसांना वडिलांवर संशय आला.
भरत जैन याची पोलिसांनी सखोल चौकशी केली. यावेळी वडिलांनी आपल्या मुलाची हत्या करण्यासाठी स्थानिक मारेकऱ्यांना सुपारी दिल्याचा खुलासा त्याने केला आहे. त्याच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी दोघा मारेकऱ्यांना अटक केली असून मुलाच्या हत्येसाठी त्यांनी सुपारी का दिली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. गुन्हा नोंदवल्यानंतर अवघ्या ४८ तासांत केशवापूरचे पोलिस स्थानकाचे निरीक्षक जगदीश हंचीनाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पित्यासह सुपारी किलर्सना बेड्या ठोकल्या आहेत. अप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.


Recent Comments