Crime

विजापूरमध्ये लोकायुक्तांची कारवाई

Share

विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील सालोटगी गावात केबीजेएनएलचे दोन अधिकारी लाच घेताना लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले आहेत.

केबीजेएनएल उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता सेवूलाल चव्हाण आणि कनिष्ठ अभियंता सातलिंगप्पा रोडगी यांनी कालव्याच्या कामाचे ३,७१,४१९ रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी एकूण १८ हजार रुपयांची लाच मागितली होती. यामध्ये सेवूलाल चव्हाण यांनी १० हजार रुपये आणि सातलिंगप्पा रोडगी यांनी ८ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कंत्राटदार नानासाहेब रूडगी यांनी लोकायुक्तांकडे तक्रार नोंदवली होती.

तक्रारीच्या आधारे कारवाई करत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी लाचेच्या रकमेसह दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली. त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याप्रकरणी विजापूर लोकायुक्त पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: