मंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचा विशेष राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. पक्षश्रेष्ठींची भेट ही नियमित प्रक्रिया असून, विभागीय कामांसाठी दिल्लीला जाणे स्वाभाविक आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, कोणत्याही मंत्र्याच्या दिल्ली दौऱ्यामागे विशेष राजकीय हेतू नसल्याचे सांगितले.

राज्यातील राजकीय घडामोडी आणि निवडणूक तयारीबाबत बोलताना, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नेते विविध ठिकाणी समाजनिहाय बैठका घेत आहेत. अलीकडे हिरियूर येथे झालेल्या बैठकीलाही आपण उपस्थित होतो. पक्षासाठी काम करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
विधान परिषद निवडणुकीतील निकालामुळे सरकारला चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी म्हटले. चार जागांपैकी विरोधकांनी तीन, तर काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. त्यामुळे याला मोठा पराभव म्हणता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री एच. सी. महादेवप्पा यांच्या नाराजीबाबत बोलताना, त्यांची नाराजी दूर होण्यासाठी काही दिवसांचा वेळ लागेल, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.


Recent Comments