Crime

दीपक पटदारी खूनप्रकरण सीआयडीकडे सोपवा : कुटुंबीयांची मागणी

Share

हुबळी तालुक्यातील गंगीवाळ गावातील ग्रामपंचायत सदस्य दीपक पटदारी यांच्या हत्येप्रकरणी अद्याप योग्य तपस झाला नसून न्यायदेखील मिळाला नाही. या प्रकरणातील आरोपींसोबत पोलीस देखील सहभागी आहेत, असा आरोप दीपक पटदारी यांच्या पत्नीने केला आहे.

हुबळी येथे याप्रकरणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत दीपक पटदारी यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी करत पोलिसांवर आरोप केले.

अडीच महिने उलटूनही आपल्याला न्याय मिळाला नसून आपल्या पतीच्या हत्येचा तपास सीआयडी कडे सोपविण्यात यावा अशी मागणी पटदारी यांच्या पत्नी पुष्पा पटदारी यांनी केली आहे केली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून पैसे घेतल्याचा आरोप करत आपल्या पतीच्या हत्येप्रकरणी यल्लाप्पा शंकराप्पा मेटी, रुद्रप्पा शंकराप्पा मेटी, नागराज मल्लप्पा हेग्गन्नावर या आरोपींना अटक करण्यात आली नाही तसेच या प्रकरणाबाबत पोलिसांकडून आपल्याला न्याय मिळाला नाही. त्यामुळे याची चौकशी सीआयडीच्या माध्यमातून करण्यात यावी अशी मागणीही पटदारी यांच्या पत्नीने केली आहे()

यावेळी पटदारी यांच्या भावानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी तसेच या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी हत्येसाठी वापरण्यात आलेली हत्यारे बदलण्यात आल्याचा संशय देखील यावेळी पटदारी यांच्या भावाने व्यक्त केलाय.()

दीपक पटदारी यांच्या खून प्रकरणाचा तपास वेगाने व्हावा, तसेच या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, याप्रकरणी पोलिसांचे होत असलेले दुर्लक्ष याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून हा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी पटदारी यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Tags: