Vijayapura

मंत्री उमेश कत्ती यांनी दिली विजापूर जिल्ह्याला भेट

Share

विजापूर जिल्ह्यात यंदा पावसाने कहर केला असून हजरो एकर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. गावातील अनेक रस्ते जलमय झाले असून या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भागाची पाहणी करण्यासाठी आलेले उमेश कत्ती आणि त्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान नागरिकांनी व्यक्त केलेली नाराजी… यासंदर्भातील हा विशेष रिपोर्ट पाहुयात…

विजापूर जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली आल्याने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर आणखीन मोठे संकट आले आहे. अशातच महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीमावर्ती भागातील नद्यांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. विजापूर जिल्ह्यातील डोणी नदीलाही मुसळधार पावसामुळे पूर आला असून या भागाची पाहणी करण्यासाठी आज मंत्री उमेश कत्ती दाखल झाले होते. यादरम्यान त्यांनी केलेली या भागाची पाहणी हि केवळ नावापुरतीच असल्याचा आरोप येथील नागरीकांनी केलाय. वरवर दाखविण्यासाठी आलेले मंत्री उमेश कत्ती हे संपूर्ण गावात फिरकलेच नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्याचप्रमाणे हरनाळ गावच्या स्थलांतरासंदर्भात देखील अनेक वेळा मागणी करूनही ती अद्याप पूर्ण झाली नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. () + ()

यावेळी सर्वप्रथम हरनाळ गावात उमेश कत्ती यांनी भेट देऊन पिकांची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी भाजप नेते विजूगौड पाटील, आमदार सुनीलगौडा पाटील आदींसह जिल्हा प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांनी परिस्थितीसंदर्भात माहिती दिली.

यावेळी उमेश कत्ती बोलताना म्हणाले, टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा ऑगस्ट महिन्यात अधिक पाऊस झाला असून अतिवृष्टीमुळे अनेक गावात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना १० हजार रुपये भरपाई देण्यात आली असून नागरिकांसह जनावरांचेही या आपत्तीत हाल झाले आहेत. यासंदर्भात नुकसान भरपाई योजनेत पिकांच्या नुकसानीची नोंद करून नुकसान भरपाईचे वितरित केले जातील, असे उमेश कत्ती म्हणाले. ()

पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मंत्री उमेश कत्ती पुढील दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून येथील जनतेच्या समस्या ऐकून तोडगा काढतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags: