माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अमृतमहोत्सवांदरम्यान जमलेल्या कार्यकर्त्यांची संख्या पाहून भाजप अधिवेशन घेण्याच्या तयारीत असल्यासंदर्भात चर्चा सुरु असून यावर विजापूरचे आमदार एम बी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाला गरज असेल तर त्यांनी खुशाल अधिवेशन घ्यावे, मात्र या कार्यक्रमास जमलेली संख्या पुन्हा जमणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

व्हॉइस : सिद्धरामय्या यांचा जन्मदिवस हा एक कार्यक्रम होता. राज्याच्या इतिहासात जितकी गर्दी झाली नाही तितकी गर्दी या कार्यक्रमास होती. ना भूतो ना भविष्यती असा हा कार्यक्रम झाला. भाजपाला गरज भासल्यास त्यांनी अधिवेशन भरवून पाहावे, या कार्यक्रमास झालेल्या गर्दीपैकी अर्धी गर्दीही त्यांच्या अधिवेशनात नसेल अशी खिल्ली त्यांनी उडविली.

सिद्धरामय्या यांच्या कार्यक्रमात जमलेल्या गर्दीने काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून काँग्रेसला नवचैतन्य मिळाल्याचेही एम बी पाटील म्हणाले. जनतेत केवळ भाजपाची हवा आहे. काँग्रेसमधून मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करण्याबाबत कोणीही चर्चा न करण्याचे निर्देश राहुल गांधी यांनी दिले असून निवडणुकीपूर्वी संख्याबळ वाढविणे गरजेचे असल्याचेही एम बी पाटील म्हणाले.
११५, १२५, १३०, १४० जागांवर आपला विजय होणे गरजेचे असून काँग्रेस हायकमांड, सोनिया गांधी यांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे, असेही एम बी पाटील यांनी स्पष्ट केले.


Recent Comments