Crime

हिंडलग्याच्या ‘त्या’ कंत्राटदाराची उडुपीत आत्महत्या

Share

ग्रामविकास मंत्री ईश्वरपा यांनी ४०% लाच मागितल्याचा आरोप केलेल्या हिंडलगा (ता. बेळगाव) येथील कंत्राटदार संतोष पाटील याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

बेळगाव ग्रामीण मतदार संघात संतोष पाटील यांनी काही विकासकामे केली होती. त्यांची बिले मंजूर करण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ईश्वरप्पा यांनी बिलाच्या रकमेच्या ४०% इत्तक्की लाच मागितल्याचा आरोप त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर वर्क ऑर्डर नसताना त्यांनी ही कामे केल्याने बिले देण्याचा प्रश्नच येत नाही असे सांगून मंत्री ईश्वरप्पा यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले होते.

यानंतर संतोष पाटील यांनी सुसाईड नोट लिहून बेपत्ता झाले होते. आज सकाळी उडुपी येथील एका लॉजमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ माजली आहे.

Tags: