आपल्या पुढील कारकिर्दीसाठी एखादा स्वार्थ मनात ठेऊन दानधर्म करणारे अनेक अवलिया आपल्या समाजात आहेत. परंतु निस्वार्थीपणे कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता दान करणारे किंचितच आढळून येतील. अशा मोजक्या लोकांमधील एक अवलिया म्हणजेच महावीर पडनाड. महावीर पडनाड यांच्या दानशूरपणाचा लेखाजोखा जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमधून…

अथणी तालुक्यातील संकोनट्टी गावातील महावीर पडनाड. तालुक्यातील शाळा, आश्रम देवस्थाने यांच्यासाठी २० लाखांहून अधिक रकमेचे दान देतात. आपल्या वाड-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळीच्या औचित्याने महिला आणि अबालवृद्धांसहित अनेकांना पडनाड यांच्यावतीने देणगीरूपी दान देण्यात येते. दिवाळीच्या निमित्ताने ककमरी रायलिंगेश्वर संस्थान मठाचे अभिनव गुरुलिंग जगम स्वामी यांच्या हस्ते रविवारी महावीर पडनाड यांचे वडील दिवंगत बाबुराव पडनाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आई गोदाबाई पडनाड आणि पंतांनी कल्पना पडनाड यांच्याहस्ते लहान मुले-मुली, महिला, जेयष्ठ नागरिक यांना भेटीदाखल वस्तू देण्यात आल्या. याचप्रमाणे १०८ पंडितांना प्रत्येकी १२०० रुपयांची दक्षिणा देण्यात आली. 
या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत असलेले ककमरी रायलिंगेश्वर संस्थान मठाचे गुरुलिंग जगम महास्वामींजी यावेळी बोलताना म्हणाले, सध्याच्या युगात निस्वार्थीपणाने राहणारी माणसे खूप कमी आहेत. कोणत्या ना कोणत्या परतफेडीची अपेक्षा ठेऊन आजकाल दान धर्म केले जाते. या सर्वांना फाटा देऊन आपले वेगळेपण जपत आणि कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणाने आपल्या वाडवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दान देत महावीर पडनाड यांनी समाजात एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. सध्याच्या युगात आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणारे खूप आहेत परंतु आपल्या संस्कृतीशी एकरूप होऊन आपल्या आई वडिलांचे ऋण फेडणारे महावीर पडनाड यांच्यासारखे खूप कमी आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार महेश कुमठळ्ळी बोलताना म्हणाले, ज्यांच्याकडे अमाप पैसे आहे ते लोक मौज, मजा, मस्ती आणि प्रवास करतात. परंतु आपली स्वतःची संपत्ती समाजाच्या हितासाठी दान करणारे महावीर पडनाड हे समाजात एक आदर्शवत कार्य करत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी महावीर पडनाड बोलताना म्हणाले, सामाजिक जाणीव ठेवून समाजकार्य करणे हि काळाची गरज आहे. मला मिळालेला अंशतः भाग मी समाजसेवेसाठी दान देत आहे. समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत आहे. आपली जबाबदारी आपल्या कुटुंबापुरती मर्यादित न राहता समाजातील प्रत्येकाच्या दुःखात, अडचणीच्या काळात सहभागी होऊन जबाबदारी स्वीकारून मदत केली तरच निरोगी समाजाची निर्मिती होईल, असे मत महावीर पडनाड यांनी व्यक्त केले.
यावेळी केपीसीसी सदस्य दिग्विजयसिंग पवार देसाई, वकील सी. bi. पडनाड, जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी डी. एस. डिग्गरजे, डॉ. आनंद मुतालिक, जकप्पा करीबसप्पगोळ, अमर दुर्गान्नावर, भरत बहुरूपी, ब्रह्मकुमारी तुळसाकनवर, रेखा पाटील, जयश्री अल्बाळ, शभिनाबानू हुक्केरी,, मल्लय्या हिरेमठ, सुभाष हुब्बळ्ळी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments