Kagawad

उगारमध्ये टेक्सास कंपनीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

Share

कागवाड तालुक्यातील उगार येथील सरकारी कन्नड आणि मराठी शाळेतील ७०० विद्यार्थ्यांना बंगळुरूच्या टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स कंपनीच्या वतीने स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना टेक्सास कंपनीचे अधिकारी भरत के. एन. म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता अभ्यासासोबतच स्वतःमधील कौशल्ये वाढवली पाहिजेत. आपल्याला शिक्षण देणारे गुरू आणि जन्म देणारे माता-पिता यांच्याविषयी नेहमी मनात आदर बाळगावा, तरच तुमचे जीवन सार्थकी लागेल.

कार्यक्रमाला टेक्सास कंपनीच्या प्रतिनिधी सुजाता अशोक हुल्लोळी आणि विद्याश्री आर. उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत साहित्याचे वितरण केले. उगारच्या सरकारी मराठी शाळेत मुख्याध्यापक एस. बी. तोडकर, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नीता कुंभार, ए. एम. मगदूम, बी. एन. आगावे यांच्या उपस्थितीत १३६ विद्यार्थ्यांना बॅग देण्यात आल्या.

यानंतर फरीदखानवाडी गावातील सरकारी शाळेत मुख्याध्यापक महेश हुल्लोळी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी उगार नगरपालिकेचे सदस्य राजू पाटील, वीरभद्र कटगेरी, प्रकाश अंबले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महालिंग कटगेरी आणि शिक्षक वृंद उपस्थित होता.

सुकुमार बन्नूरे
इना न्यूज कागवाड

Tags: