Kagawad

नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात शेडबाळ येथे निदर्शने

Share

नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार तसेच प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांचा निषेध करत नवी दिल्लीत उपोषणाला बसलेले पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.

केंद्र सरकारच्या काळात सातत्याने होणाऱ्या परीक्षा गैरव्यवहारांमुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले असून दोषींवर कठोर कारवाई करून सोनम वांगचुक यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी उत्तर कर्नाटक भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस सुभाष ढाले यांनी केली.

आंदोलनकर्त्यांनी कागवाडच्या तहसीलदारांना निवेदन सादर केले. यावेळी विविध संस्था, संघ – संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सुकुमार बन्नूरे, इन न्यूज, कागवाड

Tags: