खानापूर तालुक्यातील जळगा गावातील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिराचा चौकट पूजन विधी आ. डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते पार पडला.

खानापूर तालुक्यातील जळगा गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा चौकट पूजन समारंभ उत्साहात भक्तिभावाने पार पडला. खानापूर तालुक्याच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी या सोहळ्यात सहभागी होऊन पूजन करून मंदिराची चौकट बसवली. यावेळी विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले.
‘बोला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा जयघोष करत असंख्य भाविकांनी या समारंभात भाग घेतला. चौकट पूजनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.


Recent Comments