खानापूर तालुक्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या भटक्या समुदायातील घर नसलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्यांच्याकडे स्वतःची जागा आहे, अशा पात्र लाभार्थ्यांनी घर बांधण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

सन २०२६-२०२७ या वर्षासाठी कर्नाटक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती भटके विकास निगमच्या वतीने, खानापूर तालुक्यातील एससी/एसटी भटक्या जमातीमधील स्वतःची जागा असलेल्या परंतु घर नसलेल्या नागरिकांसाठी घर बांधकामाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.

इच्छुक व पात्र अर्जदारांनी खानापूर येथील समाजकल्याण विभागाच्या साहाय्यक संचालकांच्या कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून, आवश्यक कागदपत्रांसह ३१ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी समाजकल्याण विभागाच्या खानापूर कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन साहाय्यक संचालकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


Recent Comments