खानापूर तालुक्यातील हिरेमन्नोळी गावासाठी नव्या बस सेवेचा प्रारंभ गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

ग्रामस्थांच्या मागणीची पूर्तता झाल्याने, समिती सदस्य विवेक तडकोड आणि बस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

खानापूर ते एम. के. हुबळी मार्गावर हिरेमन्नोळी गावासाठी ही नवी बस सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या प्रसंगी बोलताना सूर्यकांत कुलकर्णी यांनी सांगितले की, डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या शिफारशीनुसार गॅरंटी योजना समिती कार्य करत आहे. हिरेमन्नोळी ग्रामस्थांच्या मागणीनुसार ही सेवा सुरू केली असून, तालुक्यातील समस्यांसाठी कार्यालयाशी संपर्क साधल्यास पक्षभेद विसरून कामे केली जातील, असे आश्वासन सूर्यकांत कुलकर्णी यांनी दिले.
या कार्यक्रमाला गॅरंटी योजना सदस्य विवेक तडकोड, चालक महबूब पारस, वाहक मणियार, ग्रामपंचायत पीडीओ राजू तळवार, बाबू देसनूर, अशोक नेमन्नवर, शिवनप्पा घाडीकोप्प, बाबू पच्चर, निंगप्पा होसमनी, कोमल करेन्नवर, निंगप्पा देवलत्ती, पंचमंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments