खानापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र असोगा येथे आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी लोकांच्या तक्रार निवारणासंदर्भात बैठक घेतली.

होय, असोगा येथे आयोजित तक्रार निवारण बैठकीत भाग घेऊन आ. अंजली निंबाळकर यांनी ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वर मंदिरावरील प्रशासक हटवून मंदिर पूर्ववत ट्रस्टींकडे सोपवण्याची मागणी केली. त्याशिवाय खानापूरला जोडणारा रेल्वे अंडर पास ब्रिज निर्माण करावा अशी मागणी केली. खानापूर तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने सुमारे ४-५ महिने मलप्रभा नदी भरून वाहते.
त्यावेळी आमच्या गावात यायचे झाले तर नदी ओलांडून यावे लागते. दुथडी भरून वाहणारी नदी पार करणे कठीण आहे. त्यामुळे आमच्या गावाला संपर्क करण्यासाठी कायमस्वरूपी रेल्वे अंडर पास ब्रिज लवकरात लवकर निर्माण करावा अशी मागणी ग्रामस्थांनी आ. अंजली निंबाळकर आणि तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांच्याकडे केली. फ्लो यावेळी तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी श्री रामलिंगेश्वर मंदिरावरील प्रशासक हटवण्याबाबतच्या प्रक्रियेची माहिती देऊन रेल्वे अंडर पास ब्रिज बांधण्यासंदर्भात रेल्वे व संबधित खात्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला असोगा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments