Vijayapura

विजापुरात दोन अट्टल दुचाकी चोरटे जेरबंद

Share

 विजापुरात दोन अट्टल दुचाकी चोरटयांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

विजापूर जिल्ह्यातील हंचीनाळ एल टी २चा रहिवाशी संतोष (कंत्री) रेवू राठोड आणि मिथुन उर्फ रोहित सुरेश राठोड  अशी मोटरसायकल चोरट्यांची नावे आहेत. ते अनेक दिवसांपासून विजापूर शहरात मोटरसायकली चोरण्याचा काळा धंदा करत होते. त्यांच्याकडून २, ३०,००० रु किमतीच्या ३ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आदर्शनगर पोलिसांनी मिळालेल्या खबरीनंतर सापळा रचून त्यांना अटक केली. कोविड चाचणीनंतर त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आल्याचे एसपी आनंदकुमार यांनी सांगितले.

 

 

Tags: