बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधपणे सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून रोख रक्कम आणि मटक्याची चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे.
बेळगाव ग्रामीण ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. सरनायक आणि पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून मच्छे गावातील सार्वजनिक ठिकाणी हा छापा टाकण्यात आला. या वेळी अवैध मटका खेळवत असलेला मळमारूती नगर येथील निवासी भरमप्पा इरप्पा कालेरी (३४) याला अटक करण्यात आली. आरोपीकडून २,८७० रुपये रोकड व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

चौकशीदरम्यान ही रक्कम दुसरा आरोपी लिंगप्पा तल्लूर याला देत असल्याचे निष्पन्न झाले असून, दोघांविरोधात कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत असून तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त व पोलीस उपआयुक्तांनी पथकाचे कौतुक केले आहे.


Recent Comments