Belagavi

टिळकवाडी पोलीस ठाण्याला ‘बेळगाव व्हायब्रंट नवरात्री फाउंडेशन’कडून संगणकीय साहित्याची भेट

Share

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासोबतच सामाजिक उपक्रमांत आघाडीवर असलेल्या ‘बेळगाव व्हायब्रंट नवरात्री फाउंडेशन’च्या वतीने टिळकवाडी पोलीस ठाण्याला अधिकृत कामकाजासाठी उपयुक्त ठरणारे संगणकीय साहित्य भेट म्हणून देण्यात आले.

या उपक्रमांतर्गत संगणकीय साहित्याची भेट पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (सीपीआय) परशुराम पुजारी, फाउंडेशनचे प्रमुख विनयकुमार बाळिकाई, गोपाळ उपाध्ये, जय राठी, निखिल चिंदक, मोनिका शिंदे, रशुभ जाजू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमामुळे पोलीस विभाग आणि नागरिक यांच्यातील परस्पर सहकार्य अधिक दृढ होईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

Tags: