रामतीर्थ नगर येथील सप्तगिरी लेआउटमध्ये प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या सुमारे २५ लाख रुपये खर्चाच्या रस्ता कामाचा शुभारंभ आमदार असिफ सेठ यांनी केला.

बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी युवा नेते अमान सेठ आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांच्या समवेत प्रभाग क्रमांक ४६ मधील रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने स्थानिक नागरिकांना, विशेषतः पावसाळ्यात, मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांच्या दळणवळणात अडचणी निर्माण होत होत्या. आता या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील रस्त्याची स्थिती सुधारून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


बेळगाव उत्तर मतदारसंघात पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले जात असून, नागरिकांच्या समस्या सोडवून आवश्यक ती विकासकामे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले.

प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या या मागणीवर तात्काळ कारवाई करत रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार आसिफ सेठ यांचे आभार मानले.

याप्रसंगी सहायक कार्यकारी अभियंता बी. एस. केदार, समाजसेवक ताहीर सय्यद, बसवराज कोट्रशेट्टी, सरोजिनी शिंदे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Recent Comments