महिषासुर मर्दनाचा संहार आणि दुष्टशक्तींवरील विजयाचे प्रतीक असणाऱ्या आई तुळजाभवानीच्या वार्षिक मंचकी निद्रा आणि श्रमनिद्रा सोहळ्याला प्रारंभ झाला असून, देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे.
नवरात्रीपूर्वी नऊ दिवस मंचावर विश्रांती देण्याची परंपरा असून, विजयादशमीच्या सीमोल्लंघनानंतर पाच दिवस श्रमनिद्रा दिली जाते. त्यानंतर अश्विनी पौर्णिमेला आईची विधिवत सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाते. या धार्मिक विधींद्वारे देवीची पारंपरिक आराधना केली जाते.

आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भाविक पदयात्रेने तुळजापूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. देवीचे नामस्मरण, भजन आणि जयघोषात चाललेला हा प्रवास भक्तीची पराकाष्ठा दर्शवतो. देवी निद्रेतून जागी होण्याच्या पवित्र क्षणाची प्रतीक्षा आणि दुसरीकडे दर्शनासाठी निघणारी पदयात्रा हे यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरत आहे.
वार्ताहर:
विजयकुमार सारवाड
विजापूर


Recent Comments