बेळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक कित्तूर येथे वीरांगना कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या विजयानिमित्त आयोजित ‘कित्तूर उत्सव’चा उत्साहात प्रारंभ झाला. दीपप्रज्वलन, राज्यगीत आणि वंदे मातरमच्या गायनाने उत्सवाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.

देशातील प्रमुख शेतकरी नेते चुक्की नंजुंडस्वामी यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून उत्सवाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी कूडलसंगम पंचमसाली पीठाचे बसव जयमृत्युंजय स्वामीजी, कित्तूर कल्मठाचे मडीवाळ राजयोगींद्र स्वामीजी आणि निच्छाणकीचे पंचाक्षरी स्वामीजी प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी उपस्थित होते. याशिवाय बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.


ऐतिहासिक कित्तूरच्या भूमीत राज्याची संस्कृती, परंपरा आणि वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या शौर्याचे स्मरण करणारा हा उत्सव लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.

वार्ताहर:
शानूल मत्तेखान
कित्तूर



Recent Comments