बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी गावात घडलेल्या भीषण आग दुर्घटनेत एका कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील लाखोंची मालमत्ता जळून खाक झाल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे.

गावातील आंबेडकर नगरातील रहिवासी मारुती कोटे आणि श्रावण कोटे यांच्या घरात ही दुर्घटना घडली. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेली आग क्षणार्धात संपूर्ण घरात पसरली.

या आगीच्या तीव्रतेमुळे घरातील तिजोऱ्या, फ्रिज, सोफा सेट यांसारख्या मौल्यवान वस्तूंसह संपूर्ण छत पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

या दुर्घटनेत सुमारे १० ते १५ लाख रुपयांचे साहित्य आणि रोख रक्कम जळाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वस्व गमावल्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे.
महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा आणि शासनाकडून या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.



Recent Comments