विजापूर शहरातील कुंभार गल्ली येथे श्री आदिमाता सेवा संघाच्या वतीने नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात आहे. आकर्षक मूर्ती आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या उत्सवाला विशेष रूप प्राप्त झाले आहे.

विजापूर शहरातील कुंभार गल्लीत श्री आदिमाता सेवा संघाच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून देवीची आराधना सुरू आहे. अत्यंत आकर्षक रूपात साकारलेली देवीची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत असून, नागरिक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राजकीय भेद बाजूला ठेवून विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि नेते देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहत आहेत. यामुळे मंदिरात सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले..

या उत्सवासाठी कुंभार गल्लीतील स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. महिलांचा सहभाग, ओटी भरण्याचा कार्यक्रम आणि दांडिया नृत्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम अधिक रंगतदार ठरले आहेत.
श्री आदिमाता सेवा संघाच्या या उपक्रमामुळे विजापूरमध्ये धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक एकोप्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विजयकुमार सारवाड
इन न्यूज
विजापूर


Recent Comments