विजापूरजवळील रंभापूर गावात श्री रामलिंगेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना पायाचे काम करताना एक प्राचीन शिवलिंग सापडले आहे. चार ते पाच शतके जुने मानले जाणारे हे शिवलिंग मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले असून विशेष पूजा व अभिषेक करण्यात आला आहे.

गावातील जुन्या गुहेवरील भागात नवीन इमारत बांधण्यासाठी पायाचे काम सुरू होते. विशेष म्हणजे, नव्या मंदिरात प्रतिष्ठापनेसाठी नर्मदा नदीतून शिवलिंग आणण्याचे मंदिर समितीने ठरवले होते. मात्र, पायाचे काम सुरू असतानाच भूमीतून शिवलिंग प्रकट झाल्याने गावकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

याबाबत बोलताना मंदिर समितीचे सदस्य भिमू मेंडेगार म्हणाले की, मंदिराच्या जीर्णोद्धारादरम्यान हे प्राचीन शिवलिंग मिळणे ही सर्व भक्तांसाठी अत्यंत आनंदाची आणि श्रद्धेची बाब आहे.
या मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा असून दरवर्षी येथे यात्रा भरते. जुन्या परंपरेनुसार येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात, अशी माहिती ग्रामस्थ इरणा पाटील यांनी दिली.

सापडलेल्या शिवलिंगाची रचना मध्ययुगीन चालुक्य काळातील शैलीशी साधर्म्य दर्शवणारी आहे. आदिलशाही काळापूर्वीच्या या परिसराचा इतिहास पाहता, यामागील नेमका कालखंड पुरातत्व विभागाच्या अभ्यासानंतरच स्पष्ट होईल.
विजापूर


Recent Comments