बंगळुरू येथील ज्ञानभारती परिसरात असलेल्या ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’च्या (NLSIU) आवारात विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी पार पडले.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला. एनएलएसआययूच्या दक्षिण ब्लॉक, नवीन सभागृह आणि विद्यार्थी केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रामुख्याने उपस्थित होते.

या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विभू बाखरू यांच्यासह बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, कुलपती प्रा. सुधीर कृष्णस्वामी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments