कर्नाटकच्या नवीन राज्यपाल म्हणून डॉ. सुधा यादव यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विभू बाखरु यांनी नवीन राज्यपालांना शपथ दिली. विद्यमान राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ. सुधा यादव यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती.

राजभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्याला मावळते राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील, पर्यटन व ऊर्जा मंत्री के.जे. जॉर्ज, गृहमंत्री प्रियंक खरगे उपस्थित होते.

याशिवाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते चलवादी टी. नारायणस्वामी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक, राज्य सरकारच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश, पोलीस महासंचालक डॉ. एम.ए. सलीम, बेंगळुरू शहर पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंग यांच्यासह विविध मंत्री, आमदार, खासदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
State
कर्नाटकच्या नवीन राज्यपाल म्हणून डॉ. सुधा यादव यांचा शपथविधी


Recent Comments