Dharwad

धारवाडमध्ये लाठीमार; रस्त्यातच बसकण मारून निषेध

Share

दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करावयास जाताना एसीपी अनुषा यांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ युवक मंडळाच्या सदस्यांनी काळ मध्यरात्री उशिरा रस्त्यातच बसकण मारून निषेध केला. ही घटना धारवाड शहरात घडली.

होय, धारवाड शहरात गुरुवारी ७ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. एका मंडळाचे कार्यकर्ते श्री विसर्जनासाठी निघाले असतानाच एसीपी अनुषा यांनी त्यांच्यावर लाठीमार केल्याचा आरोप कार्यकर्त्यानी केला. लाठीमाराच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी रस्त्यातच ठाण मांडून निदर्शने केली. या दरम्यान पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांत जोरदार शाब्दिक बाचाबाचीही झाली.

 

Tags: