घरातील लोक पहिल्या मजल्यावर झोपले असूनही चोरटयांनी कुलूप फोडून घरात प्रवेश करून तिजोरीतील सोन्याचे दागिने लांबवीले. ही घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ शहरातील मारुती नगरात घडली.

निवृत्त केएसआरटीसी कर्मचारी सिद्दरामप्पा कल्याणी यांच्या घरी चोरटयांनी हात साफ केला. घरातील मंडळी तळमजल्याला कुलूप लावून पहिल्या मजल्यावर झोपली होती. मध्यरात्री चोरटयांनी हे कुलूप फोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कर्णफुलांसह दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले.
मारुती नगरातील आणखी एका घरातही घरफोडीचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. याप्रकरणी मुद्देबिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Recent Comments