हुबळी धारवाड महानगर पालिकेचे दोन आरोग्य अधिकारी एसीबीच्या जाळयात सापडले आहेत .
स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बिल करण्यासाठी , अठरा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती . या कारणामुळें , स्वच्छता कर्मचाऱ्यांनी , एसीपी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती .
या तक्रारीनुसार , आज हुबळीच्या विभागीय कार्यालय 10 मध्ये , लाच स्वीकारतांना एसीबी अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले . तजमीर शिरसी आणि नुरदप्पा भजंत्री हे दोघे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत . एसीबी अधिकारी अधिक तपास करीत आहेत .
Recent Comments