हुबळीतील बेंडीगेरी पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घालून नागरिकांमध्ये भीती निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
या घटनेची हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी गंभीर दखल घेत आरोपींविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार बेंडीगेरी पोलिसांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.



Recent Comments