Vijayapura

रवी हंजच्या वक्तव्याविरोधात विजापूर जिल्ह्यात निदर्शने

Share

संत बसवेश्वर यांच्याविषयी लेखक रवी हंज याने केल्याचा आरोप असलेल्या अवमानकारक वक्तव्याविरोधात विजापूर जिल्ह्यात निदर्शने करण्यात आली. विजापूर आणि बसवनबागेवाडीत बसवप्रेमी व लिंगायत समाजाच्या नेत्यांनी निषेध नोंदवला.

संत बसवेश्वर हे केवळ एका समाजाचे धर्मगुरू नसून समता, कायक आणि दासोहाचा संदेश देणारे समाजसुधारक आहेत. अशा महान व्यक्तिमत्त्वाविषयी अवमानकारक वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. रवी हंजवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

बसवनबागेवाडी आणि विजापूर शहरातही या वक्तव्यांचा निषेध करण्यात आला. संत बसवेश्वर यांचे तत्त्वज्ञान आणि वचन साहित्याला जागतिक मान्यता आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला धक्का पोहोचवण्याचे प्रयत्न निषेधार्ह असल्याचे सांगत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

या प्रकरणी विजापूरमधील गांधी चौक पोलीस ठाणे आणि बसवनबागेवाडी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. बेंगळुरू आणि बेळगावमध्येही तक्रारी करण्यात आल्या आहेत. रवी हंजला अटक करण्यासाठी लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर कोची विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आले.

विजयकुमार सारवाड, विजापूर

Tags: