बेळगावच्या खंजर गल्लीतील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या मटका जुगारावर मार्केट पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत १ हजार २१० रुपये रोख आणि मटका चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या.
१९ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय मणिकंठ पुजारी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

यावेळी दरबार गल्ली येथील साकीब मोहम्मदअली अड्डेवाले आणि बंजर गल्ली येथील फहीम जलानी कोतवाल हे स्वतःच्या फायद्यासाठी आकड्यांवर पैसे लावून मटका खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोकड आणि मटका चिठ्ठ्या जप्त केल्या.
याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५०/२०२६ अन्वये कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ७८(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी संबंधित पोलीस पथकाचे कौतुक केले.


Recent Comments