बळ्ळारी-कंप्ली राज्य महामार्गावर देवसमुद्र गावाजवळ खासगी बस आणि दुचाकीच्या अपघातात तरुणाचा पाय जायबंदी झाला असून समोरून भरधाव आलेल्या बसने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला.
कंप्ली येथील रहिवासी आणि जिंदाल कंपनीत कर्मचारी असलेला राघवेंद्र याच्या दुचाकीला कंप्लीच्या दिशेने जात असताना समोरून आलेल्या खासगी बसने धडक दिली. या अपघातात त्याचा पाय तुटला असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याला तातडीने बळ्ळारी येथील ट्रॉमा केअर केंद्रात दाखल करण्यात आले.

घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी कंप्ली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Recent Comments