Hukkeri

उन्हाळ्यात पाणीटंचाई होऊ नये यासाठी दक्षता घ्या : आमदार निखिल कत्ती

Share

आगामी उन्हाळ्यात हुक्केरी मतदारसंघातील कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आमदार निखिल कत्ती यांनी दिले.

हुक्केरी तालुका पंचायत सभागृहात आयोजित दुसऱ्या त्रैमासिक प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी टी. आर. मल्लाडद यांनी त्यांचे स्वागत केले.

आमदार कत्ती यांनी गाव विकास अधिकाऱ्यांकडून प्रत्येक गावातील पाणीपुरवठ्याच्या समस्यांची माहिती घेतली. तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना कामकाजाचा आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन केले.

बैठकीला तहसीलदार बलराम कट्टीमनी, गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष शानूल तहसीलदार, प्रकाश गावडी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी राजू मेत्री, महादेव पटगुंदी, डॉ. महांतेश नरसन्नवर, राजशेखर पाटील, अविनाश होळेप्पगोळ, गुरूशांत पावटे, ईश्वर सिद्दनाळ, रेवती मठद, प्रकाश मठद, प्रवीण मड्याळ तसेच गाव विकास अधिकारी उपस्थित होते.

Tags: