Hukkeri

हुक्केरीत तालुकास्तरीय राज्योत्सव साजरा

Share

एस. के. हायस्कूलच्या मैदानावर तहसीलदार बलराम कट्टीमनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सीमाभागातील कन्नड शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर अडवी सिद्धेश्वर मठाच्या परिसरात कन्नड साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रकाश अवलक्की आणि शिवानंद मठाचे मंजुनाथ महाराज यांच्या हस्ते भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विविध शाळांच्या विद्यार्थ्यांच्या देखाव्यांसह मिरवणुकीला सुरुवात झाली.

कर्नाटकची संस्कृती संपूर्ण जगासाठी आदर्श असून, तिचे जतन करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढे जाण्याची गरज असल्याचे हुक्केरी चंद्रशेखर महास्वामी यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ होत सी. एस. तुबची शिक्षण संस्थेच्या परिसरात पोहोचली. तेथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ईओ टी. आर. मल्लाड, ग्रेड-२ तहसीलदार प्रकाश कल्लोळी, गटशिक्षणाधिकारी रेवती मठद, पोलीस निरीक्षक शिवशंकर अवुजी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते प्रवीण माड्याळ, कृषी विभागाचे अधिकारी महादेव पटगुंदी, समाजकल्याण अधिकारी गुरूशांत पावटे, बसवराज नांदूडकर, उदय हुक्केरी, ए. के. पाटील, तमन्ना पाटील, कबीर मल्लिक यांच्यासह विविध कन्नड संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

वार्ताहर : राजू बागलकोटी, हुक्केरी

Tags: