Hukkeri

हुक्केरीत राज्योत्सव सोहळा भव्य स्वरूपात साजरा होणार: तहसीलदार बलराम कट्टीमनी

Share

हुक्केरी तालुका प्रशासनाच्या वतीने कन्नड राज्योत्सव सोहळ्याच्या नियोजनासाठी तहसीलदार कार्यालयात पूर्वतयारी बैठक पार पडली.

हुक्केरी तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कन्नड राज्योत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, सर्व नागरिकांनी एकत्र येऊन कन्नड भाषेचा आणि संस्कृतीचा गौरव वाढवावा, असेअसे आवाहन तहसीलदार बलराम कट्टीमनी यांनी केले.

या बैठकीत उपस्थितांनी विविध विषयांवर मते मांडली. कन्नड संघटनांच्या सहकार्याने शहरात कन्नड ध्वज फडकवणे, चित्ररथात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार देणे, भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेची मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीला तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. मल्लाडद, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा पाटील, कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश अवलक्की, माजी पुरसभा अध्यक्ष उदय हुक्केरी, तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, अधिकारी व कन्नड संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राजू बागलकोटी
इन न्यूज, हुक्केरी

Tags: