बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते चार विविध विकासकामांपैकी तीन कामांचे भूमिपूजन करून प्रारंभ करण्यात आला, तर एका कामाच्या प्रगतीची पाहणी करण्यात आली.


याअंतर्गत सह्याद्री नगर, जयानगर, विनायक नगर, संकल्प लेआउट, शिवनगर, के.एच.बी. कॉलनी, मुस्तफा कॉलनी, सिद्धेश्वर कॉलनी आणि ज्योती नगर या विविध परिसरांमध्ये सुसज्ज रस्ते, गटार व्यवस्था आणि युटिलिटी पाईपलाईन घालण्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.


ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक भागात आवश्यक पायाभूत सुविधा पुरवून नागरिकांचा दैनंदिन प्रवास सोयीस्कर करणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. सर्व कामे दर्जेदारपणे आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित ठेकेदारांना दिले.

दरम्यान, चिकूबाग परिसरात सुरू असलेल्या रस्ते, गटार व युटिलिटी पाईपलाईन कामाच्या प्रगतीची पाहणी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. कामाच्या गुणवत्तेबाबत आढावा घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या प्रसंगी स्थानिक नागरिक, पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments