Hukkeri

योगाचे जनआंदोलन झाल्यास भारत योग राष्ट्र बनेल: भवरलाल आर्य

Share

योगाचे जनआंदोलन उभे राहिले तरच भारत खऱ्या अर्थाने योग राष्ट्र बनेल, असे प्रतिपादन पतंजली योग समितीचे आंतरराष्ट्रीय योगगुरू भवरलाल आर्य यांनी केले.

हुक्केरी शहरातील विश्वराज कॉलनीत योगगुरू बाळकृष्ण कोलेकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रगत योग प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमात उत्तीर्ण साधकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी बाळकृष्ण कोलेकर, संजय कुस्तीगार, संभाजी निंबाळकर, बसवराज नागराळे, संदीप सूर्यवंशी, कुमार बडीगेर आदी उपस्थित होते.

भवरलाल आर्य म्हणाले की, प्रत्येक तालुका व वॉर्ड पातळीवर योग प्रशिक्षण केंद्रे सुरू करून संपूर्ण समाजाला रोगमुक्त व सशक्त करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमास परिसरातील योग साधक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: