State

म्हैसूर नंदीध्वज पूजा प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तनाची चौकशी: मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Share

म्हैसूर पॅलेस आवारात नंदीध्वज पूजेदरम्यान मंत्री बालकृष्ण, नरेंद्र स्वामी आणि बसवंतप्पा यांना प्रवेश नाकारल्याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना दिले आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना रोखून गैरवर्तन केल्याचे दिसून आले आहे. या घटनेनंतर स्वतः हस्तक्षेप करून मंत्र्यांना प्रवेश मिळवून दिला असला तरी अधिकाऱ्यांचे असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकारास जबाबदार कोण, याची चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.

चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

Tags: