बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सह्याद्री नगर येथे सुमारे ५ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते, गटार व युटिलिटी पाईपलाईन घालण्याच्या कामाचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रारंभ करण्यात आला.

सह्याद्री नगरमधील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये सुसज्ज रस्ते, गटार व्यवस्था आणि आवश्यक युटिलिटी पाईप्स बसवण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना चांगल्या सुविधा मिळण्यासोबतच दळणवळण सहज सोपे होणार असून ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक भागात आवश्यक पायाभूत सुविधा पुरवून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे आपले प्राधान्य असल्याचे आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.


उत्तम रस्ते आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांचा दैनंदिन प्रवास सोयीस्कर करणे तसेच बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणे हे मुख्य उद्दिष्ट आहे, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.

या विकासकामांमुळे परिसरातील स्वच्छता आणि दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. सर्व कामे दर्जेदारपणे पूर्ण होऊन नागरिकांना त्याचा लवकरात लवकर लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी स्थानिक नागरिक, पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments