ऊस उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढवावी, असे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
जिल्हा क्रीडांगणावर राज्योत्सवाचा ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, ऊसदराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून, शेतकरी आणि कारखानदारांमधील दराचा तिढा अद्याप कायम असल्याचे सांगितले.

बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने प्रतिटन ३,५०० रुपये देण्यास तयार आहेत. मात्र, राज्यातील इतर जिल्ह्यांत यापेक्षा कमी दर दिला जात आहे. कारखान्यांची आर्थिक क्षमता आणि शेतकऱ्यांच्या मागण्या विचारात घेऊन तोडगा काढावा लागेल, असे ते म्हणाले.
ऊस वजनात फसवणूक होत असल्याच्या आरोपांबाबत बोलताना, आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याने अधिकृत तक्रार केलेली नाही. तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्य सरकारने १ नोव्हेंबरपासून दूध दरात प्रतिलिटर आठ रुपयांची वाढ केली आहे. यापैकी सात रुपये थेट दूध उत्पादकांना, तर एक रुपया दूध संघांना मिळणार असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले.


Recent Comments