खानापूर तालुक्यातील कसबा नंदगड येथे ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ या नाटकाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

या सोहळ्याचे उद्घाटन लैला शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. एच. पाटील होते. यावेळी कृष्णा पाटील, यल्लाप्पा महाराज आणि मारुती महाराज उपस्थित होते.


याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या कु. वैष्णवी संतोष पाटील यांचा गौरव करण्यात आला. तसेच कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संघाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.

गावातील सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा व्यासपीठांची आवश्यकता असल्याचे सदानंद पाटील यांनी यावेळी सांगितले.


Recent Comments