Khanapur

हिरेमुनवळ्ळीत ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचे काम सुरू

Share

हिरेमुनवळ्ळी येथे महात्मा गांधी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रारंभ आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी, नवीन इमारतीमुळे ग्रामस्थांना अधिक चांगल्या प्रशासकीय सुविधा उपलब्ध होतील आणि गावाच्या विकासाला मदत होईल, असे सांगितले. इमारतीसाठी जागा दान करणारे मोहन संबर्गी आणि त्यांच्या बंधूंचे सामाजिक योगदान कौतुकास्पद असल्याचे नमूद करत त्यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी हिरेमुनवळ्ळी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.

अल्ताफ एम. बसरिकट्टी, खानापूर

Tags: