Belagavi

उसाला योग्य भाव न दिल्यास सुुष्मा साखर कारखान्याला घेराव : चुन्नप्पा पुजारी यांचा इशारा

Share

सुुष्मा साखर कारखान्याने उसाला योग्य भाव न दिल्यास कारखान्याला घेराव घालून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघ व हसिरू सेनेचे प्रदेशाध्यक्ष चुन्नप्पा पुजारी यांनी दिला.

गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकरी वर्षभर ऊस पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत, पैसा आणि वेळ खर्च करतात. बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि वाहतूक यांसह शेतीचा खर्च सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत योग्य भाव मिळाला नाही, तर ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडतील.

साखर कारखाने शेतकऱ्यांच्या उसातून नफा कमावतात; मात्र त्याच शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यास टाळाटाळ करणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन कारखाना व्यवस्थापनाने न्याय्य दर द्यावा. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संघटना गप्प बसणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने उसाचा दर निश्चित करावा. शेतकऱ्यांचे हक्क आणि हित जपण्यासाठी रयत संघटना सदैव संघर्षास तयार आहे. सुुष्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना तातडीने प्रतिसाद देऊन योग्य भाव द्यावा; अन्यथा शेतकऱ्यांना संघटित करून कारखान्याला घेराव घालत आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे चुन्नप्पा पुजारी यांनी स्पष्ट केले.उसाला योग्य भाव न दिल्यास सुुष्मा साखर कारखान्याला घेराव : चुन्नप्पा पुजारी यांचा इशारा

Tags: