Khanapur

खानापूरमध्ये संजय कुबल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Share

खानापूर तालुक्यात भाजपची संघटना मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे बेळगाव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष संजय कुबल यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला.

शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात आमदार प्रमोद कोचेरी यांनी संजय कुबल यांच्या कार्याचा गौरव केला. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी पक्षासाठी निःस्वार्थपणे काम केले असून, त्यांच्या परिश्रमामुळे खानापूर तालुक्यात भाजपची संघटना वाढीस लागल्याचे त्यांनी सांगितले.

दुर्गम आणि जंगल भागातील गावांमध्ये जाऊन पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासह पक्षाच्या कठीण काळातही कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून संघटना मजबूत करण्याचे काम कुबल यांनी केल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई, महिला नेत्या धनश्री सरदेसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: