चिक्कोडी मधील करोशी गावात झालेल्या दुचाकी चोरी प्रकरणाचा छडा लावत चिक्कोडी पोलिसांनी तीन चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ७० हजार रुपये मूल्याच्या एकूण ७ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
करोशी येथील रेणुका रमेश वडराळे यांनी आपल्या घरासमोर उभी केलेली दुचाकी १२ व १३ जुलै २०२६ च्या दरम्यान चोरीला गेल्याची तक्रार ८ ऑगस्ट २०२६ रोजी चिक्कोडी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी, चिक्कोडीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडा आणि पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांच्या नेतृत्वाखाली तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.
या पथकाने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली. संशयितांकडून चिक्कोडी, अंकली, बोरगाव आणि महाराष्ट्रातील सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या एकूण ७ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
जप्त केलेल्या गाड्यांमध्ये एकूण 8 वाहनांचा समावेश आहे. ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या चिक्कोडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीबद्दल बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे.


Recent Comments