चिक्कोडी तालुक्यातील अंकली येथील शिवालाय सभागृहाच्या प्रांगणात आयोजित दांडिया कार्यक्रमात केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी मुलांसोबत उत्साहाने डान्स करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमादरम्यान मुलांचा उत्साह पाहून डॉ. प्रभाकर कोरे स्वत: त्यांच्यात सहभागी झाले आणि त्यांनी मुलांसोबत ताल धरला.

त्यांचा हा साधेपणा आणि आपुलकी पाहून उपस्थित नागरिक व मुलांनी आनंद व्यक्त केला. या नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


Recent Comments