Khanapur

पावसासाठी अवरोळी-बिळकी ग्रामस्थांचे सिद्धेश्वराला साकडे

Share

खानापूर तालुक्यातील अवरोळी-बिळकी ग्रामस्थांनी परिसरात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पावसासाठी देवाचा धावा करत गावाबाहेरील जंगलातील सिद्धेश्वर मंदिराकडे पदयात्रा काढून विशेष पूजा केली.

गावातील प्रत्येक घरातून तयार करून आणलेली आंबिल आणि वाल-पावट्याची गुग्गरी (उकडलेले धान्य) सिद्धेश्वराला अर्पण करून शेतकऱ्यांनी पाऊस पडण्यासाठी साकडे घातले.

शिवभजनाच्या गजरात दिवसभर देवाची आराधना करण्यात आली आणि घरोघराहून आणलेला शिदोरीचा नैवेद्य देवाला दाखवून मंदिर प्रांगणातच सर्व ग्रामस्थांनी एकत्र महाप्रसाद घेतला.

खानापूर तालुक्याच्या पूर्व भागात पावसाच्या अभावामुळे भाताचे पीक वाळू लागले असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.

त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा आणि हाताशी आलेले उर्वरित पीक तरी वाचावे, यासाठी शेतकऱ्यांनी जुन्या परंपरेनुसार सिद्धेश्वराला साकडे घातल्याचे स्थानिक शेतकरी एन. एस. पाटील यांनी सांगितले.

Tags: