Belagavi

माहेश्वरी अंध शाळेत महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

Share

बेळगाव येथील ‘बेळगाव जिल्हा अंधसेवा संस्था’ संचलित माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत महात्मा गांधीजी, लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आणि शाळेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेने झाली. संस्थेचे सचिव श्रीनिवास शिवणगी यांनी स्वागत केले, तर राजेंद्र जैन यांनी उपस्थितांना पाहुण्यांची ओळख करून दिली.

प्रमुख पाहुणे भूपेंद्र पटेल यांनी प्रतिमा पूजन करून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने आपल्याला समाजसेवेची संधी मिळाल्याचे सांगत त्यांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.

संस्थेचे अध्यक्ष चिंतामणी ग्रामोपाध्ये यांनी अध्यक्षीय भाषणात शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या वेळी इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी महादेवी कबाडर हिनेही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी शिरीष मापू, कमलेश आचार्य, चंद्रशेखर बेंबळगी, आनंद जोशी, दत्ता आंबेकर, एम. बी. पाटील, दिनेश मेहता, अशोक सामसुख यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षिका स्मिता बिर्जे यांनी सूत्रसंचालन केले.

Tags: